Feb 25, 2009

टाईमिंग

बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात अशी एखादी घटना घडते की आपल्याला आश्चर्य वाटतं असं कसं काय घडलं! ह्या घटना चांगल्या पण असतात आणि वाईट पण असतात. उदाहरणार्थ आपण रस्त्यावरून जात असताना अचानक एखादी मोटरसायकल आपल्या अगदी जवळून जोरात ओवरटेक करून जाते; आपण त्याला शिव्या घालतो अणि अर्धा तासाने पुढे गेल्यावर आपल्या दिसतं की त्याच माणसाचा अपघात झालायं. क्षणभर छातीत धस्स होतं! आपण बोललं अणि खरं झालं अस वाटतं आपण आपल्यालाच दोष देतो पण खरंच आपल्यामुळे तो अपघात झालेला असतो का? उत्तर अर्थातच "नाही" तो माणूस आपल्या जवळून जाणे अणि त्याचा अपघात होणे हा निव्वळ योग-योग असतो दुसऱ्या भाषेत सांगायचा झालं तर त्या सगळ्या घटना घडण्याचं टाईमिंग अणि आपण त्या वेळी तिथेच असण्याचा टाईमिंग योगा-योगाने एकच असतो

अजुन एक असाच नेहमी घडणारा प्रसंग ....

आपण एखाद्या शाँपिंग कॉम्प्लेक्सच्या आवारात कार पार्किंग साठी जागा शोधत असतो आपण लांबूनच एक रिकामा स्लोट बघतो आणि गाड़ी घेवून तिथे जाईपर्यन्त आपल्या पुढे असलेला कार वाला त्या स्लोट मधे गाड़ी लावतो आपण तसेच पुढे जातो अणि मग आपल्या लक्षात येता की आत्ताच मागच्या एक स्लोट मधून एक गाड़ी बाहेर पडलीये, पण आपल्याला परत मागे जावून तिथे गाड़ी लावता येणं शक्य नाहीये आपण त्या पार्किंग एरिया मधे फक्त एक मिनिट अगोदर किंवा एक मिनिट नंतर पोहोचलो असतो तर आपल्याला नक्कीच पार्किंग साठी लगेच जागा मिळाली असती पण त्या टाईमिंगला आपण तिथे नसणं हा पण केवळ योगा-योगच असतो


अशा किती तरी घटना आपल्या आयुष्यात नेहमीच घडत असतात ज्यांच्यावर आपला काहीही कंट्रोल नसतो पण त्यांचा परिणाम आपल्यावर होत असतो अशा घटना आपण टाळू तर शकत नाही कारण केँव्हा, कुठे अणि काय घडेल हे आपल्याला माहित नसतं पण अशी घटना घडल्यावर आपण काय करावं हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं



बहुतेक वेळेला आपली प्रतिक्रिया ही प्रतिक्षिप्त स्वरूपाची असते उदाहरणार्थ आपण परिस्थीती ला दोष देतो किंवा त्या घटने मधे सामील असलेल्या कुणा तरी व्यक्तीला दोष देतो त्यातून काहीच साध्य होत नाही; फक्त त्या वेळेला आपल्याला काय करावं हे सुचत नसल्यामुळे आपण वेळ मारुण नेतो त्या ऐवजी जर आपण डोकं शांत ठेवून आणि संयम ठेवून थोड़ा विचार केला तर योग्य निर्णय घेवू शकतो ज्या मुळे परिस्थिति आटोक्यात येवू शकते अशा वागण्यामुळे आपण अप्रत्यक्ष्यरित्या टाईमिंग कंट्रोल करू शकतो